Main Featured

रूग्ण संख्या दिवसें -दिवस कमी झाल्याने काहीसा दिलासा


 Ichalkaranji corona update : इचलकरंजी येथे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार विविध 5 भागात  सहाजणांना कोरोनाची लागण झाली आहेे. तर  चौगुले मळा परिसरातील 90 वर्षीय  वृध्दाचा  मृत्यू झाला आहे.  रूग्ण संख्या दिवसेय-दिवस कमी  होत असल्याने आरोग्य प्रशासनावर गेल्या काही महिन्यांपासून पडलेला अतिरिक्त भार कमी होत चालल्याने दिलासा मिळाला आहे.

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

शहरवासियांना गुरूवारी पुन्हा दिलासा मिळाला. प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार विविध पाच भागामध्ये 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आज अखेर शहरात 3888 रूग्णांची नोंद झाली आहे. तर 3590 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. सध्या 107 जणांवर उपचार सुरू आहेत. तर  एकूण मृत्यूंची संख्या 191 वर पोहोचली आहे.

आज दिवस भरात लंगोटे मळा 2 , आमराई  रोड, वेताळ पेठ, गुलमोहर कॉलनी,  अवधुत नगर शहापूर भागात प्रत्येकी 1 रूग्ण आढळून आला.