इचलकरंजी येथील डि.के.टी.ई.मधील 2019-20 या शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षात शिकणार्‍या कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅन्ड इंजिनिअरींग, इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ग्लोबलएडज या सॉफ्टवेअर कंपनीच्या कॅम्पस प्लेसमेंट मधून सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.  

Must Read

1) शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी

2) येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना...

3) CSK च्या सुपर फॅनचे दिड लाख फिटले; धोनीनं खुद्द घेतली दखल (VIDEO)

4) खासदार उदयनराजे सरकारवर भडकले

5) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुजावर शिरीन महमदहनीफ - कॉम्प्युटर, हुल्ले रक्षा रावसाहेब - आयटी, जाधव अविनाश सुभाष - आयटी, कोळेकर शिवानी वायुकुमार - आयटी, नवाळे प्रतिक्षा रमेश - आयटी, कणसे ज्योती जयवंत - इलेक्ट्रॉनिक्स, पठाण उमर फारुक - ईटीआरएक्स यांचा समावेश आहे. अ‍ॅप्टीटयुट टेस्ट, कोडींग टेस्ट, दोन टेक्निकल फेर्‍या, आणि शेवटी एचआर फेरी इ. फेर्‍यांमधून अंतिम सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ग्लोबलएडज ही प्रोडक्ट बेसड कंपनी असल्यामुळे या कंपनीची निवड फेर्‍या हया इतर कंपन्यांच्या तुलनेत फार कठीण व क्लीष्ट असतात.

विद्यार्थ्यांच्या या सुयशाबद्दल डीकेटीई संस्थेचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, व्हाईस चेअरमन व आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील, उपसंचालिका प्रा. डॉ. सौ. एल. एस. अडमुठे, विभागप्रमुख डॉ. डी. व्ही. कोदवडे तसेच सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.