Scorpio future इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु, तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेत तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. आपल्या प्रियसी/प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करु नका. व्यवसायात आपल्या स्पर्धकांच्या तोडीस तोड राहण्यासाठी आपल्या विचारांची स्पष्टता उपयोगी पडेल. त्याचबरोबर भूतकाळातील विचारातील गोंधळ नाहीसा होण्यास मदत होईल. तुम्ही रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील.

उपाय :- भगवान शंकरावर पंचमृताचे अभिषेक करा आणि आरोग्यामध्ये उत्तम फायदे मिळवाल.