Main Featured

कोरोनाग्रस्त क्रिस्टियानो रोनाल्डोने तोडला 'नियम'


Ronaldo-breaks-rules

Sport जगातला दिग्गज फूटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो Cristiano Ronaldo यालाही कोरोना झाला आहे. मंगळवारी रोनाल्डोचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर पोर्तुगालच्या या फूटबॉलपटूला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन होणं अनिवार्य होतं.

मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार विमानतळावर Airport जाण्यासाठी रोनाल्डोने पोर्तुगाल ट्रेनिंग ग्राऊंडवर क्वारंटाईनचा नियम मोडला आणि तो विमानाने इटलीच्या टोरीन शहरात गेला. तर काही वृत्तानुसार रोनाल्डो एयर ऍम्ब्युलन्सच्या माध्यमातून इटलीला रवाना झाला.

कोरोनाच्या विळख्यात आल्यानंतर रोनाल्डो स्विडनविरुद्धच्या नेशन्स लीग मॅचमधून बाहेर झाला आहे. पोर्तुगालच्या फूटबॉल महासंघानेही रोनाल्डोला कोरोना संक्रमण झाल्याचं मान्य केलं आहे. रोनाल्डो रविवारी नेशन्स लीगमध्ये फ्रान्सविरुद्धच्या मॅचसाठी मैदानात उतरला होता.

पोर्तुगालच्या फूटबॉल महासंघानेही रोनाल्डोला कोरोना संक्रमण झाल्याचं मान्य केलं आहे. रोनाल्डो रविवारी नेशन्स लीगमध्ये फ्रान्सविरुद्धच्या मॅचसाठी मैदानात उतरला होता.