Rashid-Khan-dismissed-twice

Ipl Live Scroe
इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2020) 13व्या हंगामात 19वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) यांच्यात झाला. या सामन्यात CSKने हैदराबादला 20 धावांनी नमवले. चेन्नईनं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेत 20 ओव्हरमध्ये 167 धावांचे लक्ष हैदराबाद पुढे ठेवले. मात्र हे आव्हान हैदराबादला पार करता आले नाही. या विजयासह चेन्नईचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे.

मात्र या सामन्यात राशिद खान (Rashid Khan) विचित्र पद्धतीनं बाद झाला. या सामन्यात राशिद खाननं 8 चेंडूत 14 धावा केल्या. या खेळीत त्यानं आक्रमक फलंदाजी केली. मात्र राशिद एकाच चेंडूत दोन वेळा बाद झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादला 7 चेंडूत 22 धावांची गरज होती. राशिद खान आणि शाहबाज नदीम फलंदाजी करत होते. तर, शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) चेन्नईकडून गोलंदाजी करत होता.

राशिद खान स्ट्राइकर एण्डवर होता, संघाला जिंकवण्यासाठी राशिद मोठा शॉट खेळण्याच्या तयारीत होता. याचवेळी शार्दुलच्या चेंडूवर राशिद लॉग ऑनवर शॉट मारण्यासाठी गेला. मात्र त्याचवेळी त्याचा पाय स्टम्पला लागला आणि तो हिट विकेट आऊट झाला. मात्र त्यानं मारलेला शॉट जास्त दूरवर गेला नाही आणि दीपक चाहरनं त्याचा कॅच घेतला. मात्र एकाच चेंडूवर हिट विकेट आणि कॅच आऊट झाल्यानं कोणती विकेट ग्राह्य धरली जाणार, असा प्रश्न होता. मात्र राशिदरा हिट विकेट आऊट घोषित केले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertise


याआधी हार्दिक पांड्याही हिट विकेट आऊट झाला होता. दरम्यान, हैदराबादला हरवल्यानंतर धोनीच्या संघाचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे स्वप्न अजूनही पूर्ण होऊ शकते. गुणतालिकेत CSK सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नईनं 8 सामन्यातील 3 सामने जिंकले आहेत. CSKचा नेट रन रेट -0.390 आहे आणि 6 गुणांसह ते सहाव्या क्रमांकावर आहेत. तर परभवानंतरही हैदराबादचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.