Main Featured

...म्हणून रणवीर होऊ शकतो 'सेक्स उपचार डॉक्टर'


Ranveer-can-become-'sex-treatment-doctor'

अभिनेता रणवीर सिंग Ranveer Singhहा एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून ओळखला जातो. करिअरच्या सुरुवातीपासूनच त्यानं अनेक सहकलाकारांसोबत आपली स्पर्धा असतानाही बी- टाऊनमध्ये पाय घट्ट रोवून स्वत:चा प्रेक्षवर्ग निर्माण केला. प्रत्येक भूमिकेमध्ये जीव ओतून ती साकारण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या याच अभिनेत्याबाबत बॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीनं भलतंच वक्तव्य केलं आहे. 

अर्थात तिनं हे वक्तव्य मजेशीर अंदाजात केलं असलं तरीही त्यबाबतच्या चर्चांना मात्र उधाण आलं आहे. रणवीरचं पर्यायी करिअर म्हणून 'सेक्स उपचार डॉक्टर' ची निवड करणारी ही अभिनेत्री आहे भूमी पेडणेकर 

Advertise

Bhumi Pednekar

भूमीनं नुकतीच अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या 'No Filter Neha' या पॉडकास्ट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं काही बॉलिवूड सेलिब्रिटींना पर्यायी करिअरच्या वाटा सुचवल्या. ज्यामध्ये रणवीरचं नाव घेताच तिच्या वक्तव्यानं अनेकांचं लक्ष वेधलं. नेहानं प्रश्न विचारताच भूमीनं क्रिकेट समान्यांच्या समालोचनासाठी आयुष्मान खुरानाच्या नावाला पसंती दिली. तर, स्टँड अप कॉमेडियन म्हणून तिनं अर्जुन कपूरची निवड केली. सेक्स उपचार डॉक्टरसाठी मात्र तिनं रणवीरचं नाव पुढं केलं. 

माझ्या मते त्याच्याकडे काही भन्नाट उपाय असतील', असं ती आपल्या उत्तराचं स्पष्टीकरण देत म्हणाली. जे ऐकून नेहासुद्धा विचारातच पडली. आता रणवीर भूमीच्या या उत्तरावर कसा व्यक्त होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

दरम्यान, यावेळी नेहाशी गप्पा मारत असताना भूमीनं रणवीरसोबत काम केल्याचा अऩुभवही शेअर केला. 'बँड बाजा बारात' या चित्रपटाच्या वेळी तिनं कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम पाहिलं होतं. त्याच्या उत्साहीपणाची प्रशंसा करत आपण, त्याला पाहून भारावून गेल्याची प्रतिक्रिया तिनं दिली. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी भूमीनं यशराज फिल्मसाठी कास्टिंग डिरेक्टर म्हणूनही काम पाहिलं होतं.