Main Featured

कबनुर परिसरातील हॉटेल आणि चंदूर येथील गावठी दारू अड्ड्यावर छापा


 

Raid on a village liquor den

इचलकरंजी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) इचलकरंजीतील पथकाने कबनुर परिसरातील चक दे हॉटेल आणि चंदूर येथील गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत देशी-विदेशी मद्याचा साठा, गावठी दारू आणि दुचाकी वाहन असा 1 लाख 7 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये कबनुरातील दोघे आणि चंदुरातील एक अशा तिघांना अटक करण्यात आली.

Advertise

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली

गांधी सप्ताह अंतर्गत उद्या गुरुवारी ड्राय डे (Dry day) आहे. या पार्श्‍वभूमीवर कबनूर येथील चक दे हॉटेल आणि चंदूर येथे गावठी हातभट्टी अड्ड्यावर मद्य विक्री सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी छापे मारले असता देशी-विदेशी मद्याच्या 826 बाटल्या, गावठी दारू आणि दुचाकी वाहन असा 1 लाख 7 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तर कबनुरातील अशोक पिंपळे, सतिश पिंपळे आणि चंदुरमधील सुभाष पुजारी या तिघांना अटक केली.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत राहुल गुरव, वर्षा पाटील, जी. एच. हजारे, सुभाष कोले, विलास पवार, विजय माने सहभागी झाले होते.