RBI-changes-rules

Bank आरबीआयने RBI सर्व बँकांना 1 ऑक्टोबर 2020 पासून सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये सुरक्षा सुविधा लागू करणे अनिवार्य केले आहे. आदेशानुसार क्रेडिट आणि डेबिट कार्ड Debit Card धारकांना आंतरराष्ट्रीय व्यवहार, ऑनलाइन व्यवहार आणि कॉन्टक्टलेस कार्ड व्यवहारासाठी ग्राहकांना अर्ज करावा लागेल. याकरता त्यांना प्रायोरिटी दाखल करावी लागेल. जर आवश्यकता असल्यास तरच या सेवा मिळतील आणि त्याकरता अर्ज करावा लागेल. तसंच कोणती सर्व्हिस सक्रीय ठेवायची आहे आणि कोणती डिअॅक्टिव्हेट करायची आहे याचा निर्णय देखील ते घेऊ शकतात. या सुविधा ATM, NFC, PoS किंवा ई-कॉमर्सच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारासाठी आहेत.

आरबीआयने असे म्हटले आहे की, असे केल्याने बँक ग्राहक फसवणुकीमुळे होणारे नुकसान आणि होणारा तुमचा खर्च दोन्ही मर्यादित ठेवू शकतो. यासंदर्भात SBI, BOB, ICICI आणि HDFC बँकांनी त्यांच्या ग्राहकांना मेसेज पाठवला आहे. यामध्ये असे सांगितले आहे की, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर मिळणाऱ्या सेवा ऑक्टोबरपासून बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय ट्रान्झॅक्शनबाबतचे महत्त्वाचे नियम बदलण्यात आले आहेत

त्याचप्रमाणे केंद्र सरकारने परदेशात पैसे पाठवण्यावर टॅक्स वसूल करण्याबाबत नवा नियम लागू केला आहे. हा नियम 1 ऑक्टोबर 2020 पासून लागू झाला आहे.अशावेळी तुम्ही परदेशात शिक्षण घेणाऱ्या तुमच्या पाल्याला किंवा नातेवाईकांना पैसे पाठवणार असाल तर तुमच्या रकमेवर 5 टक्के टॅक्स कलेक्टेड अॅट सोअर्स (TCS) चे अतिरिक्त पेमेंट करावे लागेल. फायनान्स कायदा 2020 (Finance Act 2020) नुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लिबरलाइज्ड रेमिटेन्स स्कीम (LRS) अंतर्गत परदेशात पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला टीसीएस द्यावा लागेल.

शुक्रवारी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अशी माहिती दिली की, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) पेमेंट सिस्टममध्ये ऑनलाइन फंड ट्रान्सफरची सुविधा डिसेंबर 2020 पासून 24 तास उपलब्ध असेल. आतापर्यंत आरटीजीएस अंतर्गत कमीतकमी 2 लाख रुपये ट्रान्सफर केले जाऊ शकतात आणि ही सुविधा केवळ बँकाच्या कामाच्या वेळातच उपलब्ध आहे.