Pulses-reached-hundreds

मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. त्याचा परिणाम आवक कमी होण्यात झाला आणि भाजीपाल्यांचे Of vegetablesदर चांगलेच कडाडले. डाळींचे उत्पादन घटल्याने, तसेच आवक कमी झाल्याने सर्व डाळींच्या भावात किलोमागे १५ ते २० रुपयांची दरवाढ झाली आहे. पुढील काही दिवसात डाळींचे भाव आणखी कडाडण्याची चिन्हे आहेत.

Advertise

आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पाऊस सुरूच होता. पावसामुळे भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. पुणे, मुंबई परिसरात मोठा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील भाजीपाल्याला मोठी मागणी वाढली. परिणामी जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आणि दरवाढ झाली. डाळींच्या भावातही १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच डाळी शंभरीपार गेल्या आहेत. पाऊस, डाळ मीलवर अद्याप कामगार येत नसल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.