उत्तरप्रदेशातील हाथरस येथील दलित युवतीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवत घटनेतील नराधमांना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी युवा महाराष्ट्र सेनेच्यावतीने नराधमांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांना जोडे मारत शहरात बैलगाडीतून  निषेधात्मक फेरी काढण्यात आली. प्रांत कार्यालयावर जावून शिष्टमंडळाच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

युवतीवरील अत्याचाराच्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा शिवतीर्थ परिसरातून दुपारी निषेधात्मक फेरीला सुरुवात झाली. अत्याचार करणार्‍या नराधमांचे बैलगाडीत प्रतिकात्मक पुतळे बसविण्यात आले. शहरातील मुख्य मार्गावरून फेरी काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी प्रतिकात्मक पुतळ्यांना जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चात सहभागी महिला, युवकांनी हातात दोरखंड घेऊन नराधमांना फाशी देण्याची मागणी केली. 

Must Read

1) बियर बारबाबत नवी नियमावली जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

2) पूजेवेळी घंटानाद का करतात, जाणून घ्या शास्त्र

3) बॉलिवूड अभिनेत्रीला धमकी

4) मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेच्या साडीतील फोटोशूटमध्ये

5) डोनाल्ड ट्रम्प रुग्णालयातून पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये दाखल

फेरी प्रांत कार्यालयावर आल्यावर पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करत जोरदार निदर्शने करण्यात आली. अत्याचाराचे प्रकार वाढत चालले  असून या घटनांना पाठीशी न घालता संशयितांना कठोर शिक्षेचा कायदा अंमलात आणावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिरस्तेदार उदयसिंह गायकवाड यांनी निवेदन स्विकारले.

आंदोलनात सॅम आठवले, कृष्णा जावीर, राहुल लोकरे, तौसीफ इनामदार, अभिषेक घोडगिरे, सौ. खोत, सौ. जनवाडे, विजय कुरणे, अ‍ॅड. अभिजीत कांबळे, रोहित भोसले, दिपक खाणे, सौरभ गोंदकर, जावीद उन्नरगी, सचिन जाधव, अन्वर मुल्ला, आनंदा नाईक, विशाल बिळगीकर, शेखर आंबीगिरी यांच्यासह महिला, युवक सहभागी झाले होते.