Possibility-of-getting-a-pay-rise

केंद्र सरकारकडून central government ‘कंझ्युुमर प्राइस इंडेक्स-इंडस्ट्रियल वर्कर्स’ (सीपीआय-आयडब्ल्यू) या निर्देशांकात सुधारणा केली जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळेल, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ होऊ शकते.

उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, सीपीआय-आयडब्ल्यूCPI-IW चे सध्याचे आधार वर्ष २००१ आहे. ते २०१६ करण्याचा सरकारचा विचार आहे. या बदलाचा लक्षावधी औद्योगिक कामगार, सरकारी कर्मचारी 

Advertise

व निवृत्ती वेतनधारकांना लाभ होऊ शकतो.

‘सीपीआय-आयडब्ल्यू’च्या आधारे उद्योग जगतातील कर्मचाºयांचे वेतन ठरविले जाते, तसेच याच आधारावर सरकारी कर्मचाºयांचा महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई दिलासा (डीआर) ठरविला जातो. एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, आधार वर्ष बदलल्यामुळे अलीकडच्या काळातील ‘सीपीआय-आयडब्ल्यू’मध्ये बदलत्या उपभोक्ता शैलीचे प्रतिबिंब दिसून येईल. त्यानुसार, नव्या मूल्यमापनाचे आधार बदलतील. शिक्षण, आरोग्य, वाहन, मोबाइल फोन खर्च आणि शहरी घरे या बाबींना अधिक महत्त्व दिले जाईल. केंद्रीय श्रम सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले की, आगामी काही दिवसांत आम्ही निर्देशांकात सुधारणा करणार आहोत. त्याचा लाभ विविध क्षेत्रांतील कामगार-कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होईल. अधिकाºयाने सांगितले की, सुधारित निर्देशांक पुढील आठवड्यात सार्वजनिक केले जातील.