इचलकरंजी येथे परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने हातात नंगी तलवार घेऊन फिरणार्‍या तरुणास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. रहुफ फारुख मुल्ला (वय 21 रा. गोसावी गल्ली) असे त्याचे नांव असून त्याच्याकडून 200 रुपयांची तलवार जप्त करण्यात आली आहे.

Must Read

1) महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग?

2) महाराष्ट्र राज्याच्या 'या' विभागात भरती

3) अभिनयानंतर 'या' श्रेत्रात पदार्पण करतेय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर

4) मुंबई आणि पुण्यासाठी Good News

5) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बंडगरमाळ परिसरात दुपारच्या सुमारास एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रहुफ मुल्ला याला तलवारीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता दहशत माजवण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या तलवार घेऊन वावरत असल्याचे स्पष्ट झाले. स्टीलची तलवार 36 इंच लांबीची असून त्याची किंमत 200 रुपये आहे. या प्रकरणी पोकॉ महेश पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे.