टीव्हीवर अनेक नवनव्या मालिका येत आहेत पण गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांच्या सर्वात आवडती मालिका आहे. या मालिकेत सध्या अनेक बदल झालेले दिसत आहेत. त्यातलाच एक बदल म्हणजे ‘अंजली भाभी’(Anjali Bhabhi) ह्या भूमिकेसाठी सुनैना फौजदार (Sunayana Fozdar)ने एन्ट्री घेतली आहे. काही दिवसातच सुनैनाने आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे.