Main Featured

लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी पुरुषांनी नियमित खावेत फक्त 2 पदार्थ


Only-2-foods-in-regular-diet

Sex
 
बहुतेक पुरुषांच्या खांद्यावर कौटुंबिक Family  जबाबदारी असतात. ही जबाबदारी पार पाडताना त्यांना तणाव येतो आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं. पुरुषांच्या अशाच शारीरिक आरोग्यसह त्यांचं लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठीदेखील फक्त दोन पदार्थ उपयुक्त आहेत. हे पदार्थ अगदी सहजरित्या प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असतात आणि हे पदार्थ म्हणजे लसूण आणि मध.

लसूण आणि मधाचे पुरुषांसाठी बरे फायदे आहेत. या दोन्ही पदार्थांचं सेवन केल्याने पुरुषांच्या अनेक समस्या दूर होतात.

शरीराला ऊर्जा मिळते.

पुरुषांना अधिक परिश्रम करावे लागतात. लसूण आणि मध खाल्ल्याने उर्जा वाढते. यातील पौष्टिक घटक आणि ऊर्जेची मात्रा शरीरास एका क्षणात सक्रिय करते. म्हणून जर तुम्हाला थकवा येत असेल तर तुम्ही लगेच लसूण आणि मध खाण्यास सुरवात केली पाहिजे.

शारीरिक बळ मिळतं

पुरुषांनी ताकदीसाठी वारंवार लसणीचं सेवन केलं पाहिजे हे ऐकलं असेलच. लसूण शरीरातील चरबी आणि कोलेस्टेरॉल कमी करते, ज्यामुळे शरीराची क्रियाशीलता वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते. लसूण मधासह घेतल्यास त्याचा फायदा अधिक होतो. म्हणून ज्यांची शारीरिक क्षमता कमी आहे, त्यांनी लसूण आणि मधाचं सेवन करावं.

Advertise

लैंगिक इच्छा वाढवतं

शारीरिक संबंधांबद्दलची आपली आवड कमी होत आहे आणि आपल्याला लैंगिक संबंध वाढवायचे असतील तर लसूण आणि मध तुमची मदत करू शकतात. लसूण आणि मध मूड वाढवण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. जे पुरुष वडील बनू इच्छितात आणि शुक्राणूंची संख्या कमी झाल्यामुळे त्यांना अडचणी येत आहेत तर लसूण आणि मध यांचं सेवन त्यांच्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. एका अभ्यासानुसार लसूण आणि मध दोन्हींमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवण्याचे गुणधर्म आढळतात.

झोपेची समस्या दूर करण्यात उपयुक्त

myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या मते, झोपेची समस्या बहुतेक पुरुषांमध्ये दिसून येते. याची अनेक कारणे असू शकतात. ताणतणाव किंवा कधीकधी दिवसा झोपण्याच्या सवयीमुळे देखील पुरुष रात्री उशिरापर्यंत झोपत नाहीत. अशा परिस्थितीत जर आपण दररोज लसूण आणि मध खाल्लं तर त्यातील घटक झोपेसाठी आवश्यक असलेले मेलाटोनिन हार्मोन वाढवण्यास उपयुक्त ठरू शकतात.

हृदयासाठी फायदेशीर

myupchar.com शी संबंधित डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, लसणाचे सेवन हृदयासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. लसूण मधासह खाल्ल्याने हृदय निरोगी राहतं आणि हृदयविकारासारख्या समस्येचा सामना कधीही करावा लागत नाही. शरीरातील चरबीचं प्रमाणदेखील संतुलित राहतं.