Online-match-fixing

IPL
 
आयपीएल (IPL 2020) वर पुन्हा एकदा मॅच फिक्सिंग (match fixing) साठी प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या आयपीएलचा तेरावा हंगाम युएइमध्ये खेळवला जात आहे. मात्र या हंगामावर फिक्सिंगचे सावट असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मान्य केले आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंशी फिक्सिंगसाठी संपर्क साधला असल्याची माहिती आहे. याकरिता आता बीसीसीआयचे ऍण्टी करप्शन युनिटने (एसीयू) या प्रकरणाची खातरजमा केली आहे. एसीयू प्रमुख अजितसिंग म्हणाले आहेत की आयपीएलमधील एका अज्ञात व्यक्तीने फिक्सिंगबाबत खेळाडूशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. तो एजंट शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Advertise

मुख्य म्हणजे, आयपीएल दरम्यान एसीयू हा खेळ अधिक पारदर्शक करण्यासाठी खेळाडूंना ऑनलाइन समुपदेशन सत्रे देत आहे. आयपीएल खेळणार्‍या खेळाडूंना सर्व प्रोटोकॉलही देण्यात आले आहेत. आयपीएल हा बायोसॅफ्टी वातावरणात खेळला जात आहे जिथे कोणीही थेट खेळाडूशी संपर्क साधू शकत नाही, मात्र ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे खेळाडूंशी संपर्क साधता येईल. आयपीएलमधील फिक्सिंग आणि सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने यूके कंपनी 'स्पोर्ट रडार' शी करार केला असून ही तपासणी यंत्रणेद्वारे भ्रष्ट कामांवर नजर ठेवेल.

कराराचा एक भाग म्हणून, 'स्पोर्ट रडार' सर्व आयपीएल सामन्यांसाठी एसीयू बरोबर काम करेल आणि स्वतःच्या तपास यंत्रणेद्वारे भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न करेल. ‘स्पोर्ट रडार’ इंटिग्रिटी सर्व्हिसचे व्यवस्थापकीय संचालक अँड्रियास क्रॅनिक यांनी सांगितले होते की आम्ही स्पर्धेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत करू. आतापर्यंत अशी पहिली घटना समोर आली आहे जिथे या खेळाडूशी संपर्क साधला गेला आहे. या खेळाडूने तातडीने एसीयूला याबाबत माहिती दिली असली तरी बीसीसीआय पूर्णपणे सतर्क झाला असून एसीयूने त्याचा तपास वेग वाढविला आहे.