Main Featured

मायलेकी पैकी नदीपात्रात आईचा मृतदेह तर लेक अजूनही बेपत्ता


 
                                             इचलकरंजी येथे लालनगर परिसरातील दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मायलेकी पैकी गुरुवारी दुपारी पंचगंगा नदीपात्रात आईचा मृतदेह आढळून आला. श्रीमती सुनिता सुभाष कांबळे (वय 40) असे त्यांचे नांव आहे. तर मुलगी कु. अमृता सुभाष कांबळे (वय 14) हिचा शोध घेण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते.

Must Read

1) कोल्हापुरात मुसळधार; पंचगंगेच्या पातळीत वाढ

2) SBI चा इशारा ! सणासुदीच्या दरम्यान गायब होऊ शकतात तुमच्या अकाऊंटमधील पैसे

3) सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा

4) ही आहेत 5 बेस्ट झिरो बॅलन्स बचत खाती

Advertise

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, श्रीमती सुनिता कांबळे या लालनगर भागात कुटुंबियासह राहण्यास आहेत. त्यांना दोन मुले व एक मुलगी अशी अपत्ये आहेत. दहा वर्षापूर्वी सुनिता यांच्या पतीचे निधन झाले आहे. सुनिता यांना शासनाच्या निराधार योजना अंतर्गत पेन्शन मिळते. दोन दिवसापूर्वी पेन्शन आणण्यासाठी जातो असे सांगून सुनिता या मुलगी अमृतासह घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्या घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध करुनही त्या मिळून आल्या नाहीत. त्या बेपत्ता झाल्याची वर्दी मुलगा रोहित कांबळे याने गावभाग पोलिसात दिली होती. गत दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरु होता.

दरम्यान, गुरुवारी दुपारी गणपती मंदिराजवळ पंचगंगा नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह मिळून आला. जीवनमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. तो मृतदेह सुनिता कांबळे यांचा असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. कौटुंबिक वादातून सुनिता या नैराश्येत होत्या. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. तर मुलगी अमृता हिचा अद्याप शोध लागला नसून रात्री उशीरापर्यंत शोधकार्य सुरु होते. अधिक तपास पोहेकॉ जी. ए. चिले करीत आहेत