Main Featured

5 ऑक्टोंबर रोजी प्रांतकार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण


 इचलकरंजी येथे सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती तात्काळ उठवावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं 5 ऑक्टोंबर रोजी प्रांतकार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय इचलकरंजी इथं मराठा समाजातील प्रमुखांच्या बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनात मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनंही करण्यात आलं.

Must Read

सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास स्थगिती दिली आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या भवितव्याबरोबरच आरक्षणाशी संबंधित अनेक प्रश्‍न निर्माण होणार असल्यानं मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. इचलकरंजी इथंही समाजातील प्रमुखांची मराठा मंडळ सांस्कृतिक भवनमध्ये बैठक झाली. यावेळी 5 ऑक्टोंबर रोजी प्रांतकार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकल मराठा बांधवांनी या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं. बैठकीस मराठा मंडळाचे अध्यक्ष सुनील शेलार, पुंडलिक जाधव, प्रकाश मोरे, आनंदराव नेमिष्टे, बाळासाहेब देशमुख, अमृत भोसले, संतोष सावंत, मोहन मालवणकर, संजय जाधव उपस्थित होते.