इचलकरंजी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील जलशुध्दीकरण केंद्रालगतचे झाड विनापरवाना तोडल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आप्पा माळी (पूर्ण नांव समजू शकले नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद प्रभारी बाग पर्यवेक्षक सचिन शिवाजी पाटील यांनी दिली आहे. जलशुध्दीकरण केंद्रानजीक लिंबाचे पूर्ण वाढ झालेले झाड तोडत असल्याची तक्रार पालिकेकडे करण्यात आली होती. सदर ठिकाणी नगरपालिकेचा कर्मचारी महेश बुचडे हा खात्री करण्यासाठी गेला असता त्याठिकाणी उपस्थित असलेले संतोष हत्तीकर यांनी हे झाड आप्पा माळी यांनी तोडल्याचे सांगितले. विनापरवाना वृक्षतोड प्रकरणी महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 21 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Must Read

1) महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग?

2) महाराष्ट्र राज्याच्या 'या' विभागात भरती

3) अभिनयानंतर 'या' श्रेत्रात पदार्पण करतेय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर

4) मुंबई आणि पुण्यासाठी Good News

5) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा