Gold Silvar Price
 सोन्याच्या किंमतीत सलग दोन दिवस घसरण झाल्यानंतर आज दर स्थिरावले आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 188 रुपयांनी वाढले आहेत. या दरम्यान चांदीच्या किंमतीत देखील तेजी आली आहे. एक किलो चांदीचे दर 342 रुपये दराने वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते परदेशी शेअर बाजारात झालेली घसरण आणि डॉलरमध्ये आलेल्या कमजोरीमुळे सोन्याच्या किंमतीत तेजी पाहायला मिळते आहे. याआधी सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 59 रुपयांनी कमी होऊन 51,034 रुपये प्रति तोळा झाले होते, तर मंगळवारी 137 रुपयांनी कमी होत 51, 108 रुपये प्रति तोळा होते. चांदीचे दर सोमवारी 753 रुपयांनी उतरून प्रति किलो 62,008 रुपये होते तर मंगळवारी 475 रुपयांची वाढ होऊन चांदी 62,648 रुपये प्रति किलो होती.

सोन्याचे नवे दर (Gold Price, 27 October 2020)

बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 188 रुपयांनी वाढले आहेत. 99.9 टक्के शुद्धतेच्या प्रति तोळा सोन्याची किंमत आता 51,220 रुपये आहे. याआधीच्या सत्रात हे दर 51,032 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1906.70 डॉलर प्रति औंस आहेत.

चांदीचे नवे दर (Silver Price, 27 October 2020)

चांदीच्या किंमतीत आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी आली आहे. चांदीचे दर आज 342 रुपयांनी महागले आहेत. यानंतर चांदीचे दर 62,712 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीच्या किंमतीत कोणतेही बदल झाले नाही आहेत. चांदीचे भाव 24.45 डॉलर प्रति औंस आहेत.

आज का वाढले सोन्याचांदीचे दर

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर एनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल (Tapan Patel) यांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य कमी झाले आहे. याचा परिणाम सोनं आणि चांदीच्या किंमतीवर झाला आहे.