Murder-of-a-friend

Crime अश्लील शिवी दिली म्हणून चापट मारल्याचा राग मनात धरुन, मित्राने मित्राच्या डोक्यात दगड मारुन खून Blood केला. हा प्रकार आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी 

Advertise

Friday रात्री उशिरा घडला. आळंदी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

प्रफुल्ल संपत गायकवाड (27, मुळ रा-आसु, ता फलटण, जि – सातारा) याचा मृत्यू झाला आहे. तर दिपक दिगंबर भिमटे (23, मुळ रा-मोतीबाग, भोलाईस्कुल जवळ नागपुर) याला अटक केली आहे. या प्रकरणी संतोष रामचंद्र निंबाळकर (42, रा. माळवाडी, गणेश मंदीर शेजारी, सोळु, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 09/10/2020 रोजी रात्री साडे आकराच्या सुमारास घडला.

दीपक आणि प्रफुल्ल हे दोघे जेवण करीत बसले होते. त्यावेळी दिपकने प्रफुल्ल याला अश्लिल शिवी दिली. त्यामुळे प्रफुल्लने दिपकला चापट मारली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून प्रफुल्ल हा पळून जात असताना दिपकने प्रफुल्ल याला पाठीमागून दगड मारला. हा दगड प्रफुल्लच्या डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यावेळी दिपकने पुन्हा दगड उचलुन प्रफुलच्या डोक्यात मारला. यात रक्तबंबाळ झाल्याने प्रफुल्लचा मृत्यू झाला. तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जाधव करीत आहेत