Marital-harassment

तालुक्यातील घोडेगाव माहेर असलेल्या २४ वर्षीय विवाहितेचा पतीसह सासरच्या (लोतखेड ता. अकोट) मंडळीने संगनमताने माहेरहून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावीत शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी दहीहांडा पोलिसांनी महिला तक्रार निवारण कक्षाचे तडजोडीचे प्रयत्न असफल ठरल्याने तक्रारीवरून पती, सासू, सासरे व नणंद अशा चार आरोपींविरुद्ध गुन्हे Crimeदाखल केले आहेत.

Must Read 

1) 'सिंघम'ची हिरोईन अडकली लग्नाच्या बेडीत PHOTO VIRAL

2) राज्य सरकारकडून रेल्वे प्रवासासाठी ॲॅप

3) रिपब्लिक टीव्हीला पुन्हा बजावली नोटीस

4) ‘तारक मेहता’च्या ‘गोगी’ला जीवे मारण्याची धमकी

5) तुमची कंगना तर आमची उर्मिला !

6) 'आशिकी गर्ल'चं बॅकलेस फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

फिर्यादी पीडितेचा पती चेतन रामकृष्ण कडू, सासू वनमाला रामकृष्ण कडू, सासरे रामकृष्ण लखुजी कडू सर्व रा. लोतखेड ता. अकोट व नणंद प्रीती सारंगधर अरबट रा. सोनाळा पूर्णा ता. बाळापूर यांनी संगनमत करून पीडितेने माहेरवरून ५० हजार रुपये आणावे, या कारणास्तव तिला शिवीगाळ व मारहाण करून व पेट्रोल टाकून जाळून मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला. अशा तक्रारीवरून व मतनी कक्षात तडजोड न झाल्याने सर्व आरोपींविरुद्ध भादंवि ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६ कलमान्वये दहिहांडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.