Main Featured

दीपिका पदुकोनच्या नावावर मध्यप्रदेशात मनरेगाचे कार्ड


MNREGACHE-CARD

bollywood बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोन Deepika Padukone 

Advertise

एक स्थलांतरित मजूर असून मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात ती मनरेगाचे काम करते, असे सांगितले तर कुणीही ही बाब हसण्यावरच नेईल; पण तिच्या नावाचे मनरेगाचे बनावट कार्ड मात्र तसे दाखवीत आहे. दीपिकासह अशा दहा स्टार लोकांची नावे मनरेगाच्या यादीत आहेत.

मध्यप्रदेशातील झिरनिया पंचायतीच्या पिपरखेडा नाका गावात हे स्टार मजुरी करीत आहेत. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बनावट कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांचे दावे करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, सोनू शांतीलाल यांना गावाजवळ नाला बनविण्यासाठी पैसे देण्यात आले आहेत.

तलाव आणि कॅनॉल बनविण्यासाठी ३० हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. शांतीलाल आणि अन्य लोकांची नावे यावर आहेत; पण त्यांना याबाबत काहीच माहीत नाही. यात नाव असलेले दुबे म्हणतात की, एक दिवसही असे काम केलेले नाही.