इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला शिरढोण-कुरुंदवाड मार्गावरील नदी पुलाजवळ आणि टाकवडे येथील लक्ष्मी देवालय अशा दोन ठिकाणी गळती लागल्याने शहरातील पाणी पुरवठ्यावर विपरित परिणाम जाणवणार आहे.कृष्णा नळपाणी पुरवठा योजना सातत्याने गळतीच्या दृष्टचक्रात अडकली आहे. सतत मुख्य जलवाहिनीला गळती लागत असल्याने शहरातील पाणी पुरवठा वारंवार खंडीत होतो. गुरुवारी या मुख्य जलवाहिनीला दोन ठिकाणी गळती लागल्याचे निदर्शनास आले. शिरढोण-कुरुंदवाड मार्गावरील पंचगंगा नदी पुलानजीक मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने सुमारे 15 ते 20 फुट लांबपर्यंत पाण्याचा फवारा उडत होता.

Advertise

Must Read

1) कोल्हापुरात मुसळधार; पंचगंगेच्या पातळीत वाढ

2) SBI चा इशारा ! सणासुदीच्या दरम्यान गायब होऊ शकतात तुमच्या अकाऊंटमधील पैसे

3) सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा

4) ही आहेत 5 बेस्ट झिरो बॅलन्स बचत खाती

 रस्त्याच्या एका बाजूकडून दुसर्‍या बाजूपर्यंत पाण्याचा मोठ्या प्रमाणात फवारा उडत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. पाण्याच्या दाबामुळे जलवाहिनीजवळील दगडही पाण्यासोबत उडून पडत होते. मोठ्या प्रमाणात पाणी ऊसाच्या पिकात शिरल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.

टाकवडे येथील लक्ष्मी देवालय परिसरात याठिकाणीही जलवाहिनीला गळती लागली आहे. दोन्ही ठिकाणी लागलेल्या गळतीमुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. हे गळती काढण्याचे काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार असून नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी केले आहे.