Main Featured

गायत्री मोबाईल शॉपी चोरी प्रकरण : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांद्वारे तपास सुरु


 
इचलकरंजी येथील गायत्री मोबाईल शॉपीमधील चोरीच्या तपासासाठी शिवाजीनगर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांद्वारे तपास सुरु आहे. संशयित चोरटे हे शहराबाहेरील असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

Advertise

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील गायत्री मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल 17 लाख रुपये किंमतीचे महागडे 107 मोबाईल लांबविले आहेत. भरवस्तीत झालेल्या धाडशी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. शिवाजीनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सीसीटिव्ही फुटेज व उपलब्ध माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. जवळपास सहा ते आठ जणांची टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. कोल्हापूरच्या दिशेने चोरटे गेल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून त्या अनुषंगाने तपास सुरु आहे.