इचलकरंजी येथे महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचार व बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. महाविकास आघाडी सरकारने या घटनांकडे पूर्णपणे डोळेझाक केले आहे. अल्पवयीन मुली व वयस्कर महिलाही असुरक्षित असून त्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. म्हणूनच वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ इचलकरंजी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्यावतीने कॉ. मलाबादे चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

Must Read

1) ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार

2) आता मोबाईलमधील प्रायव्हेट डेटा राहील १०० टक्के सुरक्षित

3) महेंद्रसिंग धोनीच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली

4) PHOTO:अमृता खानविलकरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट

5) विद्यापीठाच्या परीक्षांबाबत गोंधळ; प्रवेशपत्रात चुका

गत वर्षभरात महाराष्ट्रामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या () अनेक घटना घडल्या आहेत. त्यामध्ये गोरेगाव येथील 6 वर्षीय मुलीवरील अत्याचार, औरंगाबाद मधील 19 वर्षीय युवतीवर झालेला सामुहिक पाशवी अत्याचार, पनवेल कोविड सेंटर मधील कोरोनारुग्ण महिलेवरील बलात्कार, रोहा येथील 14 वर्षीय मुलीवर झालेला सामुहिक बलात्कार अशा अनेक मानवजातीला काळिमा फासणार्‍या घटनांचा समावेश आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर शासन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या अत्याचारांच्या निषेधार्थ भाजपा महिला आघाडीच्यावतीने राज्यव्यापी आंदोलनाचे पुकारले आहे. त्या अनुषंगाने इचलकरंजीतही आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष अनिल डाळ्या, महिला आघाडी शहराध्यक्षा सौ. पुनम जाधव नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, जिल्हा उपाध्यक्षा सौ. विजया पाटील, जिल्हा चिटणीस श्रीमती वैशाली नायकवडे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सौ.अश्‍विनी कुबडगे, शहराध्यक्षा सौ. पुनम जाधव, सौ.सरला घोरपडे, शहर चिटणीस सौ. योगिता दाभोळे, सौ. संगिता साळुंखे, सौ. नागुबाई लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.