Main Featured

मुलींना सेक्स गुलाम बनवण्यासाठी जबरदस्ती करत आहेत 'हे' काम


ISIS-atrocities-continue

sex 
सीरियामध्ये ISIS या दहशतवादी संघटनेने धुमाकूळ घातला आहे. जगभरातील विविध ताकदवान राष्ट्र या संघटनेच्या विरोधात मैदानात उतरली असून सीरियानेदेखील या संघटनेला नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या संघटनेने दुसऱ्या देशांमध्ये आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अत्याचारदेखील येथील जनतेवर आणि स्त्रियांवर करत आहेत. आफ्रिका खंडातील देशांमध्ये या संघटनेने आपले हातपाय पसरले असून तेथील नैसर्गिक साधन संपत्तीवर कब्जा करण्याबरोबरच मुलींवरदेखील अत्याचार करण्यात येत आहेत. यासाठी या मुलींना जबरदस्ती गर्भनिरोधक गोळ्या खायला घालण्यात येत असून त्यांना सेक्स गुलाम म्हणून वापरण्यात येत आहे.

सध्या ISIS या दहशतवादी 

Advertise

Terrorist संघटनेने जॉर्डन, इस्रायल, पॅलेस्टाइन, लेबनान, कुवेत, सायप्रस, तुर्की आणि पाकिस्तानसह भारतातदेखील आपले बस्तान बसवले आहे. त्यामुळे या सर्व देशांना या संघटनेचा मोठा धोका आहे. सध्या त्यांनी आफ्रिकन देशांवर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून या ठिकाणी मुलींवर आणि महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत आहेत. न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार, तेथील मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार करण्यात येत आहेत. त्यांचा बळजबरी गर्भपातदेखील करण्यात येत आहे. या मुलींना दररोज गर्भनिरोधक गोळ्या खायला दिल्या जात असून त्यांचा वापर सेक्स गुलाम म्हणून केला जात आहे.

ISIS ने तयार केले आहेत नियम
यासाठी या दहशतवाद्यांनी नियमदेखील बनवले आहेत. या मुली गर्भवती होऊ नयेत म्हणून काळजी घेतली जाते. या मुलींबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याआधी दहशतवादी त्यांना गर्भनिरोधक गोळ्या खायला देतात. त्यामुळे या मुली गर्भवती होत नाहीत. त्यामुळे ISIS लहान मुलींपासून ते 40 वर्षांच्या स्त्रियांना गुलाम म्हणून ठेवत आहेत.

मुलींची केली जाते विक्री

न्यूयॉर्क टाइम्समध्ये आलेल्या रिपोर्टनुसार या दहशतवाद्यांच्या कैदेतून सुटलेल्या 700 यहुदी सेक्स स्लेव्हपैकी केवळ 5 टक्के गर्भवती होत्या. जर मुली गर्भवती राहिल्या तर त्यांचा बळजबरी गर्भपात केला जात असे. त्याचबरोबर यासंदर्भात अनेक मुलींनी मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एका दहशतवाद्याकडून दुसऱ्याला विकताना या मुलींची प्रेग्नेंसी टेस्ट केली जात असे. तसेच सर्टिफिकेट बरोबर असेल तरच मुलींची विक्री होत असे. दरम्यान, सीरियाने या दहशतवादी संघटनेला नष्ट केल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांनी दुसऱ्या देशांमध्ये आपले बस्तान बसवले असून त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि संपत्ती देखील समोर येत आहे.