Here-are-9-symptoms-of-a-heart-attack

Health
हृदयरोगां (heart attack)चे प्रमाण सध्या खुपच वाढले असून यास बिघडलेली जीवनशैली हे सर्वात मोठे कारण आहे. विशेष म्हणजे सर्व वयोगटात ही समस्या दिसत असल्याने याचे गांभिर्य वाढले आहे. महिलांमध्ये आणि पुरूषांमध्ये हार्ट अटॅक( heart attack)ची कारणं वेगवेगळी असतात. 40 ते 65 या वयोगटात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असतं. हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर काही संकेत देत असतं. अटॅक मेंदूचा असो किंवा हार्टचा अचानक येतो. पण काही आठवडे आधी शरीरात काही बदल दिसून येतात. हे संकेत ओळखल्यास वेळीच उपाय करून जीव वाचवणे शक्य होऊ शकते. हार्ट अटॅक येण्यापूर्वी कोणती लक्षणं आढळून येतात, ते जाणून घेवूयात.

ही आहेत लक्षणं

Advertise

1 चालताना छाती खूप जास्त हेवी वाटणे. यास एंजायना पेन असंही म्हटलं जातं. हे हृदयाच्या आजारांचे मोठं लक्षण आहे. 

2 अचानक श्वास घ्यायला त्रास होणे. चालताना, जिने चढताना किंवा उतरताना दम लागणे.

3 अनेकदा घश्यात जळजळ सुद्धा होत असते. काहीही खाताना जळजळ होते. काहीही खाल्यानंतर अशी समस्या होणे हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.

4 काहीही खाल्यानंतर चालण्या फिरण्यास त्रास होणं, छातीत जळजळणं यामुळे हार्टचे इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते.

5 चक्कर, उलटी, पोटाच्या समस्या उद्भवतात.

6 महत्वाचं लक्षणं म्हणजे विकनेस, थकवा खूप जाणवतो.

7 काही लोकांना डावा हात दुखण्याची समस्या उद्भवते. साधारणपणे चालताना ही समस्या वाढते.

8 खूप जास्त खोकला कफची समस्या असून हाता-पायांना सूज येत असेल तर गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.

9 काहींना शारीरिक श्रम न करता घाम येण्याची समस्या जाणवते.