Governor's-advice

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांची भेट घेतली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दरवाढ (Milk Rate) आणि वाढीव वीज बिलाच्या (electricity bil)प्रश्नी राज्यपालांची भेट घेतली असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसंच, राज्यपालांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.

राज ठाकरे यांनी आज सकाळी 10.30 च्या सुमारास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन  भेट घेतली.‌ 'लॉकडाऊनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे. याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही.  म्हणून राज्यपालांशी बोलण्यासाठी आलो', असं राज यांनी स्पष्ट केले.

'वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपालांशी चर्चा केली. लवकरच वाढीव वीज बिलाबाबत शरद पवारांशी चर्चा करणार आहे.  लवकरात लवकर लोकांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे,  राज्यपालांकडूनही शरद पवारांशी बोलणाच्या सल्ला देण्यात आला आहे, असंही राज ठाकरे यांनी सांगितले.

Must Read 

1) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

3) 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनायाने शेअर केला साडीतला फोटो

4) Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा वधारलं सोनं,

5) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय़

6) युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल....


'एका छोट्याशा विषयाला इतका वेळ लावण्यात आला आहे. कळतं नाही नेमकं काय अडकलं आहे. त्यामुळे या विषयावर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी बोलणार आहे', असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

तसंच,'दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावरही राज ठाकरेंनी लक्ष्य वेधलं. आज दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे शेतकऱ्याला 17 ते 18 रुपये देतात आणि त्यावर भरघोस नफा कमवत असतात. कधी सुका दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. वाढत्या महागाईमुळे गुरांची देखभाल करणे महाग झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एका लिटरमागे 27 ते 28 रुपये मिळावे', अशी मागणीही राज ठाकरेंनी केली.