Government-job-opportunities

JOB
देशातील तरुणांना सरकारी नोकरी Government Job मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. कोचीन शिपयार्डच्या विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. ज्यामध्ये शीट मेटल वर्कर, वेल्डर, फिटर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटार वाहन, चित्रकार, इलेक्ट्रीशियन आणि क्रेन ऑपरेटरसह सर्व पदांसाठी भरती असणार आहे. 

यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार cochinshipyard.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2020 आहे.

पदांची नावे व संख्या
Cochin Shipyard मध्ये या भरती अंतर्गत 577 पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे. ज्यामध्ये शीट मेटल वर्कर, वेल्डर, फिटर, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटर वाहन, चित्रकार, इलेक्ट्रीशियन आणि क्रेन ऑपरेटरसह इतर पदांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्ड / संस्था / विद्यापीठातून दहावी पास असणे आवश्यक आहे. यासह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा केलेला असावा.

Advertise

वयाची मर्यादा
कोचीन शिपयार्ड भरतीसाठी 30 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत वय ग्राह्य धरले जाईल.

अर्जासाठी शुल्क
या पदांसाठी अर्ज करताना सामान्य आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 300 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. तर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना 200 रुपये भरावे लागतील.

निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व प्रॅक्टिकलच्या आधारे केली जाणार आहे. ज्यामध्ये 50 गुणांची लेखी परीक्षा असेल तर 50 गुण प्रॅक्टिकलचे असतील.

अर्ज करण्याची अंतिम तारीख
इच्छुक आणि पात्र उमेदवार 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

कोरोना संकट काळात नोकरीच्या संधी 
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात बेरोजगारी वाढल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमावाव्या लागल्या. भारतासह जगभरात मंदीचे वातावरण आहे. या बिकट परिस्थितीमध्ये अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये काही सरकारी कंपन्या, बँका आणि रेल्वेने बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.