इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील गायत्री शॉपी या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी विविध कंपन्यांचे महागडे तब्बल 16 लाख 66 हजार 323 रुपये किंमतीचे 107 मोबाईल लंपास केले. ही घटना मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद रवि जनार्दन हजारे (वय 34 रा. गोलघुमट कॉलनी कोरोची) यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे. मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या या घटनेने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertise

Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं

याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरुन मिळालेलीमाहिती अशी, फिर्यादी रवि हजारे यांच्या मालकीचे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बँक ऑफ महाराष्ट्र लगतच गायत्री शॉपी नामक मोबाईल दुकान आहे. हजारे नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री दुकान बंद करुन गेले होते. सकाळी दहा वाजता ते दुकान उघडण्यासाठी आले असताना दुकानाचे शटर उचकटल्याचे आणि दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप कापून व शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानात विक्रीसाठी ठेवलेले विविध कंपन्यांचे  महागडे मोबाईल चोरट्यांनी लांबविले. त्यामध्ये सॅमसंग कंपनीचे 4 लाख 68 हजार 614 रुपयांचे 23, रियल मी कंपनीचे 76 हजार 493 रुपयांचे 8, ऑनप्लस कंपनीचे 54 हजार 574 रुपये किंमतीचे 2, अ‍ॅपल कंपनीचे 1 लाख 36 हजार 224 किंमतीचे 2, विवो कंपनीचे 3 लाख 69 हजार 526 रुपयांचे 35 आणि ओप्पो कंपनीचे 5 लाख 60 हजार 892 रुपये किंमतीचे 37 मोबाईल असे 16 लाख 66 हजार 323 रुपयांचे तब्बल 107 मोबाईलचा समावेश आहे. चोरट्यांनी केवळ मोबाईल नेऊन त्याचे रिकामे बॉक्स दुकानातच टाकले होते.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करुन सीसीटिव्ही फुटेज तपासले असता दोघे चोरटे दुकानात चोरी करताना कैद झाले आहेत. त्यांचे काही साथीदारही असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सुमारे अर्धातासाहून अधिक काळ चोरटे दुकानात चोरी करत होते. घटनास्थळी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांना काही ठसेही मिळाले आहेत. त्याचबरोबर चोरट्यांचा माग काढण्यासाठी स्टेला श्‍वानपथकही आणण्यात आले होते. ते दुकानापासून छत्रपती शिवाजी पुतळा आणि सिटी इन हॉटेल या परिसरातच घुटमळत राहिले. त्यामुळे चोरट्यांनी चोरीनंतर पलायन करण्यासाठी एखाद्या वाहनाचा वापर केला असल्याचा पोलिसांचा कयास आहे.