Flipkart-Sale

Shoping
अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी फेस्टिव्ह सीजनमध्ये ग्राहकांसाठी सेल आणला आहे. यातच फ्लिपकार्ट FlipkartFlipkart-Sale ने सुद्धा Big Billion Days सेलची घोषणा केली आहे.

फ्लिपकार्टने शुक्रवारी जाहीर केले आहे की, बिग बिलियन डेच्या 5 दिवस आधी ग्राहक निवडक प्रोडक्ट बुक करू शकतात. फ्लिपकार्टने 11 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत सेलच्या आधी निवडक प्रोडक्ट निवडण्याचा ऑप्शन दिला आहे आणि ग्राहक निवडलेले प्रोडक्ट सेलच्या आधी फक्त एक रुपयात बुक करू शकतात.

16 ऑक्टोबरपासून सुरु होतोय Big Billion Days सेल
Flipkart Big Billion Days Sale ची सुरुवात 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. प्री-बुकिंग करणारे ग्राहक बिग बिलियन डेज सेलच्या दिवशी बुक केलेल्या प्रोडक्टचे उर्वरित पेमेंट करून खरेदी करू शकतात. तसेच, ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी ऑनलाईन किंवा कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन देण्यात आला आहे.

प्री-बुकिंगसाठी सुमारे 10 लाख प्रोडक्ट उपलब्ध असणार आहेत. यामध्ये होम, लाइफस्टाइल, ब्युटी, बेबीकेअर आणि इलेक्ट्रॉनिक अ‍ॅक्सेसरीजचा समावेश आहे. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलसोबत अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडिया फेस्टिव्हल आणि स्नॅपडीलचा कुम में डम सेल सुरू आहे.

ऑनलाइन मागणी वाढणार
फ्लिपकार्टच्यावतीने असे सांगण्यात आले होते की, सेलदरम्यान सुमारे 200 स्पेशल अॅडिशन प्रोडक्ट आणले जाणार आहेत. यात 100 पेक्षा जास्त लीडिंग ब्रँड प्रोडक्ट असणार आहेत. सेलदरम्यान या प्रोडक्टच्या खरेदीवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच, बजाज फिन सर्व्हिस आणि इतर लिडिंगच्या बँकांकडून नो कॉस्ट इएमआयचा ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. फ्लिपकार्टने पेटीएमशी भागीदारी केली आहे. त्यामुळे सेलदरम्यान ग्राहकांना पेटीएम वॉलेट आणि पेटीएम यूपीआयच्या माध्यमातून कॅशबॅक ऑफर दिली जाणार आहे.

इंडस्ट्रीच्या अहवालानुसार, आगामी फेस्टिव्हल सीजन सेलदरम्यान ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन मागणी असू शकते. अहवालानुसार ऑनलाइन मागणी 40 ते 50 टक्के असू शकते. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टने पुरवठा व मागणीची पूर्तता करण्यासाठी 3.4 मिलियन चौरस फूट स्पेसचा समावेश केला आहे. 