Filed-a-rape-case

Crime
पोलिस कर्मचाऱ्याकडून चौदा वर्षापूर्वी झालेल्या बलात्कार प्रकरणात कायदेशीर मदत करण्याचे आमिष दाखवून दुसऱ्या एका पोलिस Police  कर्मचाऱ्याने मागील दहा वर्षाच्या काळात वारंवार बलात्कार केल्याची तक्रार महिलेने लोणी काळभोर पोलिसांकडे दाखल केली आहे. त्यानुसार वाकड पोलिस ठाण्यातील कर्मचारी मनोज पांडुरंग बनसोडे याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली आहे. 

पीडित महिलेचे पुणे शहरातील एका पोलिस ठाण्याजवळ बांगड्यांचे दुकान

Advertise

आहे. त्यातून तिची अनेक पोलिसांबरोबर ओळख आहे. त्यामधून शहर पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्याने चौदा वर्षापूर्वी (सन २००६) बलात्कार केल्याची तक्रार तिने दाखल केली होती. या प्रकरणामधून पोलिस कर्मचारी निर्दोष सुटला. मात्र, या प्रकरणात बनसोडे याने, मी पोलिस खात्यात आहे, मला कायद्याची चांगली जाण आहे व माझ्या चांगल्या ओळखी आहेत, आपण हायकोर्टात अपील करू. मी तुला न्याय मिळवून देतो, असे सांगत ओळख वाढवली. 
दरम्यान, वरिष्ठ न्यायालयात जाण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला विविध ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

या दरम्यान महिलेने त्याच्याकडे लग्न करण्याबाबत विचारणा केली. मात्र, त्याने दोघांच्या शारीरिक संबंधाच्या व्हिडिओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देऊन गप्प राहण्याच्या धमक्या देण्यास सुरवात केली, अशी तक्रार संबंधित महिलेने शनिवारी (ता. १०) लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.