Experiences-of-Corona-Patients

मी मदन रामनाथ लाठी मुळ जळगाव निवासी हल्ली मुक्काम न्यु सांगवीत पुण्यात मुलाकडे. पुर्ण जग करोना ह्या रोगाशी लढत आहे. आम्ही दोघे जण लढलो आणि सर्व शासकीय Officialयंत्रणेच्या मदतीने आज पुर्ववत येण्याचा मार्गावर प़यत्न सुरू आहे. तसा हा रोगाची त्वरीत दखल घेतली आणि त्वरीत उपचार सुरू केलेत तर यशस्वी मात करु शकतो.

मला अचानक ७ सप्टेंबर रोजी रात्री थंडी वाजून ताप खोकला सुरवात झाली. या विशाणु रोग होईल याचा कधी विचारच केला नव्हता. कारण वेळोवेळी पालन करीत होतो. दुसऱ्यादिवशी येथेच खाजगी डॉक्टरांना दाखविले. त्यांनी लांबुनच बघुन तीन-चार दिवसांची औषधे Drugs लिहुन दिलीत आणि नाही फरक पडला परत या असे सांगितले. या चार-पाच दिवसात थंडी-ताप चढ-उतार सुरू राहीला. चार-पाच दिवसाने परत डॉ. कडे गेलो आणि काही टेस्ट त्यांच्याकडे (त्यात करोना नव्हे). रिपोर्ट दुसऱ्या दिवशी मिळाला परंतु त्यात काही नव्हते.

त्यावेळी त्यांनी करोना (कोव्हिडची) Corona (Covidchi)टेस्ट करण्यात सांगितले. खाजगी करा किंवा शासकीय करा तुमची मर्जी. तसाच मी घरी आलो आणि शासकीय टेस्ट करण्याचे ठरविले आणि त्याच वेळी कैंद़ीय मंत्री आदरणीय श्री नितिन गडकरी Minister Respected Mr. Nitin Gadkariसरांचे जनसंपर्क अधिकारी श्री जयंत दिक्षीत सरांचा फोन आला आणि त्यांनी महत्त्वाचे ब़िदवाक्य सांगितले की, फक्त आपण घाबरु नका, धैय ठेवा, आॅक्सीजन लेव्हल चेक करत रहा.

त्याचवेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आदरणीय श्री श़वण हर्डीकर सरांचे नाव माझ्या लक्षात आले आणि त्यांचशी संपर्क साधुन यात मार्गदर्शन करावे ही विनंती केली आणि पुर्ण परिवाराची कोव्हीड टेस्ट करण्याचे ठरविले.

Advertise

आयुक्त सरांनी सुचना देवुन दिं १४ सप्टेंबर सोमवार रोजी कोव्हीड टेस्ट साठी सेंटरवर गेलो त्यात पुर्ण परिवाराची म्हणजे मी, माझी पत्नी, मुलगा आणि सुनबाई टेस्ट केली. त्यात मी आणि माझी पत्नी पाॅझीटीव्ह. माझा मुलगा आणि सुनबाई ते दोघेही निगेटिव्ह रिपोर्ट आला.

सुरवातीला विश्वास पाॅझीटीव्ह आलो यावर विश्वास बसत नव्हता. परंतु जी परिस्थिती होती त्यावर तातडीने उपचार होणे महत्त्वाचे. अगोदरच विलंब झाला होता आणि त्यात श्री जयंत दिक्षीत सरांचे ब़िदवाक्य लक्षात ठेवुन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता दवाखान्यात आम्ही दाम्पंत्य भर्ती झालो. दवाखान्यातील परिस्थिती बघितली तर धैयच आले. जे डाॅक्टर्स, नर्सेस, दवाखान्यातील स्टाॅफ, भारत विकास ग़ुपचे कर्मचारी सर्वांना बघितले की किती आत्मविश्वासाने आणि विशेष म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करिता आलेल्या पेशंटची काळजीपूर्वक सेवा आणि त्यात विशेष म्हणजे व़ुध्द, अपंग यांची काळजी घेत त्यांना वेळोवेळी जी सेवा लागली त्या प़त्येक वेळी हे सर्व परमेश्वर रुपी आणि अहोरात्र सेवा देत होते. त्यांच एकच लक्ष्य या दवाखान्यातुन प़त्येक पेशंट बरा होऊन जाणे हेच लक्ष्य ठेवुन रात्रंदिवस सेवा सेवा हा प़त्येक परमेश्वर रुपी यंत्रणेचा ध्यास.

हि सेवा बघितली तर मीच काय कुठलाही पेशंटचा निम्मे आजार दुर आणि प्रत्येक पेशंटचा हा आत्मविश्वास की मी लवकरात लवकर बरा होऊ कारण त्या शासकीय यंत्रणेत साक्षात परमेश्वर प़त्येक पेशंटची किंवा आपल्या भक्तांची सेवा करीत होते. त्यात प़त्येक पेशंट ची दर तीन तासांनी बीपी, आॅक्सीजन आवश्यक तपासत असे त्या प़माणे प़त्येक पेशंटला शासकीय सर्व अधिकारी वेळोवेळी औषध देत होते त्या बरोबर महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पेशंटला वेळोवेळी चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारची चहा, संध्याकाळ चे जेवण उपलब्ध करून प्रत्येक पेशंटला रात्री औषध (वेळोवेळी इंजेक्शन, सलाईन किंवा जे काही आवश्यक) देत असे. प्रत्येक पेशंटला असे वाटते की आपण स्वर्गातच आहे आणि आपण निश्र्चित बरे होऊन घरी जावु.

आम्ही साधारणत: दहा दिवसांनंतर घरी जाण्याची वेळ आली तेंव्हा पुढचा काही घरातच ईतर सदस्यांना त्रास होणार नाही आणि पुढे काही दिवस घरात प़त्येक पेशंट ने घ्यावयाची काळजी आणि औषधे नियमित ठरलेल्या वेळीच घ्यावी हे आवर्जुंन आणि समजावून सांगत होते.

त्याप़माणे आम्ही घरी नियमांचे तंतोतंत पालन करुन ती वेळ अथवा ठरलेले दिवस  काळजी ने पुर्ण केलेत. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४आॅक्टोबर लोकमत औरंगाबाद ची तीन किलोमीटर स्पर्धेत आपल्या घराजवळ वाकिंग करुन यशस्वी रित्या पुर्ण करुन सर्टफिकेट मिळाले.

या सर्वांचं क्षेय आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सर्व शासकीय अधिकारी आणि विशेष म्हणजे आम्हास पुण्यासारख्या शहरात परमेश्वर रुपी मदत करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आदरणीय श्री श्रवण हर्डीकर सर, डॉ पवन सालवे सर, डॉ होडकर सर, डॉ आंबेडकर मॅडम, आणि सर्व डॉक्टर्स, नर्सेस, दवाखान्यातील सर्व परमेश्वर रुपी यंत्रणेस कोटी कोटी वंदन.

यात आम्ही सर्वांनां आवर्जून विनंती करतो की आपणा कुठलेही म्हणजे थंडी, ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी अश्याप़कारची काहीही लक्षणे दिसल्यास आपण त्वरीत जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन न विलंब करता दाखवा हि विनंती.