Eknath Khadse led the NCP

माझे अधिकार अबाधित राहतील याची मला खात्री द्या अशी चर्चा काही दिवसांपूर्वीच मी आमचे पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी केली आहे." "महाविकास आघाडीने आधीच ठरवलेल्या बाबींमध्ये एकनाथ खडसेंनी ढवळाढवळ केली अथवा माझ्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप केला तर संघर्ष अटळ आहे. या सर्व बाबी स्पष्ट न होताच त्यांचा प्रवेश झाला तर मी माझा निर्णय घेईन." असा इशाराही स्थानिक आमदाराने दिला आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ खडसे (Eknath Khadse) विरुद्ध शिवसेना हा जुना संघर्ष आहे. हा संघर्ष 2014 मध्ये टोकाला गेला. शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा करण्यासाठी एकनाथ खडसेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुढाकार घेतला होता.

Advertise

आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत अशी जोरदार चर्चा सुरू आहे. याला राष्ट्रवादी काँग्रेससोबतच शिवसेनेच्या स्थानिक आमदार आणि नेत्यांचाही विरोध आहे.

 "आमचे पाच आमदार आहेत. आमच्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेसच्याच स्थानिक नेत्यांना अडचण आहे. आम्हाला तर कायम खडसेंनी त्रास दिला आहे. यापुढेही देतील हे आम्ही गृहीत धरले आहे. त्यामुळे आतापर्यंत नडलो तसेच पुढेही नडू.""एकनाथ खडसेंची एवढीच ताकद असती तर त्यांच्या मुलीचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असता का? त्यांची काही आता ताकद राहिलेली नाही. मग त्यांना मोठं करण्याचे काम का केले जात आहे?" असाही प्रश्न शिवसेनेच्या आमदाराकडून उपस्थित करण्यात आला.

खानदेशात राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congressचा सध्या एकच आमदार आहे. साधारण 2009 पर्यंत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 पैकी 5 आमदार होते. पण कालांतराने ही संख्या घटत गेली. शिवसेनेने मात्र आपले पाच आमदार कायम राखण्यात यश मिळवलं.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांचे सहकारी पक्ष आहेत.