Main Featured

ड्राय डे ला मद्यविक्री करणार्‍या बिअरबार परमिटरूमधील दोघांना अटक


Dry Day arrested both इचलकरंजी येथे ड्राय डे ला मद्यविक्री करणार्‍या आलास इथल्या समाधान बिअरबार परमिटरूमधील दोघांना इचलकरंजीतील पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार यांच्या पथकानं अटक केली. सचिन जगताप आणि राहुल सुर्यवंशी अशी त्यांची नावं आहेत. या कारवाईत विविध कंपन्यांचा मद्यसाठा, एक दुचाकी वाहन, 2 मोबाईल असा सुमारे 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

Advertise

Must Read


गांधी जयंतीला ड्राय डे असल्यानं मद्यविक्रीवर बंदी (Ban on the sale of alcohol)  असते. तरीही कवठेगुलंद इथं राहणारे सचिन जगताप आणि राहुल सुर्यवंशी हे दोघे शिरोळ तालुक्यातील आलास इथं समाधान बिअरबार, परमिटरूम सुरू ठेवून मद्य विक्री करत होते. याबाबत माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक गणेश बिरादार यांच्या पथकानं छापा टाकून दोघांना अटक केली. या कारवाईत विविध कंपन्यांचा मद्यसाठा, एक दुचाकी वाहन, 2 मोबाईल असा सुमारे 75 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ड्राय डेला मद्य विक्री आणि कोरोना संसर्ग रोखण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.