Main Featured

दिवाळी सानुग्रह अनुदान व साडेबारा हजार रुपये अग्रीमसह विविध मागण्या


 

                                            

इचलकरंजी नगरपरिषद (Ichalkaranji Municipal Council) सर्व कामगार संघटना कृती समितीच्या वतीने नगरपालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना 25 हजार रुपये  दिवाळी सानुग्रह अनुदान व साडेबारा हजार रुपये अग्रीमसह विविध मागण्यांचे निवेदन नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

Advertise

Must Read

1) ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलणार

2) आता मोबाईलमधील प्रायव्हेट डेटा राहील १०० टक्के सुरक्षित

3) महेंद्रसिंग धोनीच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली

4) PHOTO:अमृता खानविलकरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट

5) विद्यापीठाच्या परीक्षांबाबत गोंधळ; प्रवेशपत्रात चुका

निवेदनात, दिवाळी सण साजरा करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे सभागृहाच्या ठरावानुसार दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून 25 हजार रुपये द्यावे, शासन निर्णयानुसार 12 हजार 500 रुपये अग्रीम देणेत यावा, नगरपरिषद कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग फरकाचा पहिला हप्ता मार्च 2020 पूर्वी देणे आवश्यक असताना तो अद्याप प्रलंबित असून तो दिवाळीपूर्वी द्यावा, कोविड 19 मध्ये जोखिम पत्करून काम करणार्‍या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी व सर्वच कर्मचार्‍यांना एक हजार रुपये प्रोत्साहन रक्कम द्यावी, सुट्टीदिवशी केलेल्या कामाचा मोबदला तातडीने देण्यात यावा आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कामगार संघटना प्रतिनिधींनी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याशी चर्चा केली.

 यावेळी नगरपरिषद कामगार कृती समिती, जनरल कामगार संघ, म्युनिसिपल वर्कर्स युनियन (इंटक), इचलकरंजी नगरपरिषद कामगार युनियन (सीटू), आदर्श कामगार युनियन, स्वाभिमानी कामगार संघटना, भारतीय मजदूर संघ, वाल्मिकी म्हेत्तर समाज संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस कर्मचारी संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.