भाजपा युवा मोर्चा जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष पदी  - शुभम बरगे

भारतीय जनता युवा मोर्चा सोशल मीडिया शहराध्यक्ष शुभम बरगे यांची भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा युवा मोर्चा सोशल मीडिया अध्यक्ष पदी निवड कोल्हापूर येथील जिल्हा ग्रामीण कार्यालय येथे युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांतदादा पाटील व जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम पार पडला.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार.सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामाची दखल घेऊन युवा मोर्चा प्रदेश कार्यालयाने शुभम बरगे यांची कोल्हापूर जिल्हा युवा मोर्चा सोशल मीडिया अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.या निवडीचे पत्र जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुर्दशन पाटसकर, अनुप मोरे,सरचिटणीस सुनिल मेंगडे, प्रदेश युवती संयोजिका वैशाली खाडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबा देसाई,संघटन मंत्री शिवाजी बुवा,युवा मोर्चा इचलकरंजी शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण पाटिल इचलकरंजी शहर उपाध्यक्ष सतिष पंडित, ज्येष्ठ नेते नंदकुमार पवार, युवा मोर्चा सरचिटणीस प्रमोद बचाटे , अरविंद चौगुले सर्व तालुका युवा मोर्चा अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते.