इचलकरंजी येथे गेल्या दोन दिवसांपासून वरुणराजाने संततधार पण जोरदार  हजेरी लावल्याने इचलकरंजीतील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यामध्ये बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस बरसत राहिल्याने सखल भागात गटारी तुंबून सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. दिवसभर पावसाने ठाण मांडल्याने सूर्यप्रकाशचे दर्शनही होऊ शकले नाही.

पश्‍चिम बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा (Low pressure belt) निर्माण झाल्याने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा (Warning of heavy rain) देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून दुपारच्या सत्रात पावसाने दमदार हजेरी लावली होती. मंगळवारी रात्री तर सुमारे दोन तास पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. तर बुधवारी सकाळपासूनच पावसाने बरसण्यास सुरुवात केली.

Advertise

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

सकाळपासूनच संततधार बरसणार्‍या पावसामुळे शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊन गेले होते. पावसामुळे नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिकांसह, छोट्या विक्रेत्यांची अडचण झाली होती. नेहमी खाद्यपदार्थ, फळांच्या गाड्याने व्यापालेला रस्ता पावसामुळे आज रिकामा झाला होता. मुख्य चौका-चौकात ठाण मांडणार्‍या छोट्या विक्रेत्यांना व्यवसाय करता आला नाही. संततधार बरसणार्‍या पावसामुळे शहरातील सर्वच रस्ते ओस पडले होते.

शहरातील चांदणी चौक, विकली मार्केट, श्रीपादनगर परिसरासह सखल भागात गटारींचे सांडपाणी रस्त्यावरुन ओसंडून वाहत होते. त्यामुळे त्याठिकाणच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते.