Discount-up-to-Rs-3-lakh-on-these-vehicles


Mahindra 
सण उत्सवांचा काळ काही आठवड्यांवर आला आहे. या उत्सवाच्या काळात सवलतीसह ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसंच जास्त विक्री होण्यासाठी आणि बाजारात आपल्या कंपनीचं नाव वाढवण्यासाठी उत्सवाच्या काळात ग्राहकांसाठी खास ऑफर्स जाहीर करतात. महिंद्रा ॲंड महिंद्रा Mahindra And Mahindra ही सध्या भारतातील सर्वात मोठ्या युटिलिटी व्हेईकल (UV) उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे, जी डिस्काउंट क्लबमध्ये आता सामील झाली आहे.

महिंद्रा आपल्या बहुतेक गाड्यांवर 3.06 लाख रुपयांपर्यंत सवलत देत आहे. यात UV रेंज पासून ते Bolero फ्लॅगशीप स्पोर्ट यूटिलिटी (SUV) अल्ट्रास G4 मॉडेल या गाड्यांचाही समावेश आहे. नवीन बाजारात आलेल्या Thar आणि KUV100 या गाड्यांवर या सवलती लागू करण्यात येणार नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

महिंद्रा Alturas G4

अल्ट्रास G4 महिंद्राच्या फ्लॅगशीप SUV वर सर्वात जास्त 3.06 लाख रुपयांची सूट मिळणार आहे. ज्यामध्ये 2.20 लाखांची रोख सूट, 50,000 पर्यंत एक्सचेंज बेनिफिट तसंच 20,000 पर्यंतच्या ऍक्सेसरिजचा समावेश आहे. Alturas ही यापैकी सगळ्यात स्वस्त SUV आहे, जी दोन मॉडेल्समध्ये मिळते. एक एन्ट्री लेवल टू व्हील ड्राईव्ह आणि दुसरी फुल्ली लोडेड फोर व्हील वेरिएंट.

Advertise

महिंद्रा KUV100 NXT

सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांपैकी सगळ्यात उत्कृष्ट 7 सीटर SUV म्हणजेच XUV500ला 2.2 लिटरचं डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. त्यात महिंद्रा काही प्रकारांसाठी 55,000 रुपयांपर्यंतची सूट देत आहे. तसंच XUV500 च्या W7 आणि W5 या गाड्यांवर 51,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो. तसंच W9 आणि W11 या प्रकारांसाठी 57,000 रुपयांची सूट मिळणार आहे. XUV500 हे महिंद्राचं सगळ्यात जुनं मॉडेल आहे.

महिंद्रा Scorpio

स्कॉर्पियो आणखी एक सगळ्यात लोकप्रिय असलेली SUV कार आहे. सध्या S5, S7, S9, S11 या प्रकारात उपलब्ध आहे. ज्यात S5 वर 20,000 रुपयांपर्यंत रोख सूट, तसंच 25,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस, 10,000 रुपयांपर्यंत ऍक्सेसरिज आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येणार आहे. तसंच S7, S9, S11 यावर फक्त एक्सचेंज बेनिफिट देण्यात आलं आहे. या गाड्यांवर रोख सूट किंवा मोफत सामान देण्यात येणार नसल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

महिंद्रा Marazzo

Marazzo MPV हे BS6 स्टँडर्डसहित बाजारात आलेलं नवीन मॉडेल आहे. यांच्या M4 आणि M6 या प्रकारांवर 10,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपये एक्सचेंज बेनिफिट, 6,000 रुपये कॉर्पोरेट सूट आणि 5000 रुपयांपर्यंत ऍक्सेसरिज देण्यात येणार आहे.

महिंद्रा XUV300

ही गाडी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. यात 30,000 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. ज्यात 25,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात येणार आहे.

महिंद्रा Bolero

बोलेरो ही महिंद्राच्या गाड्यांपैकी दोन दशकांपेक्षा जुनी गाडी आहे. या गाडीमध्ये बऱ्याच वर्षात खूप बदल घडवून आणण्यात आले आहेत. या गाडीवर 20,500 रुपयांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. त्यात 6,500 रुपयांची रोख सूट 10,000 रुपये एक्सचेंज बेनिफिट आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आहे.