Main Featured

कोरोनामुक्त शहरासाठी थुंकीमुक्त इचलकरंजीचा निर्धार


 

Determination-of-spit-free-Ichalkaranjiइचलकरंजी येथे कोरोना महामारीचा कायमस्वरुपी नायनाट होण्यासाठी स्वयंशिस्त गरजेची आहे. शहरात कोरोनाचा प्रसार आणि मृत्युदर यांचा आलेख वाढता होता. सध्या त्यावर काही प्रमाणात नियंत्रण आले असून प्रशासनही विविध उपाययोजना करत आहे. त्याच अनुषंगाने कोरोनामुक्त शहरासाठी इचलकरंजी नागरिक मंच यांच्यावतीने थुंकीमुक्त (Spit free) इचलकरंजीचा निर्धार करण्यात आला.

Advertise

Must Read

1) बियर बारबाबत नवी नियमावली जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

2) पूजेवेळी घंटानाद का करतात, जाणून घ्या शास्त्र

3) बॉलिवूड अभिनेत्रीला धमकी

4) मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरेच्या साडीतील फोटोशूटमध्ये

5) डोनाल्ड ट्रम्प रुग्णालयातून पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये दाखल

शिवकुमार मुरतुले यांच्या संकल्पनेतून इचलकरंजी नागरिक मंचच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी थुंकीमुक्त इचलकरंजीसाठी कॉ. के. एल. मलाबादे चौक व महात्मा गांधी पुतळा परिसरात जनाजगृती करण्यात आली. विविध संदेश देणारे पोस्टर व घोषणांद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. इचलकरंजी नागरिक मंचद्वारे पुढाकार घेऊन सुरुवात झालेल्या या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाने करावी. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी इनामंतर्फे यावेळी करण्यात आली आहे.

या उपक्रमात इनामं चे राजु कोन्नूर, अमित बियाणी, सुहास पाटील, शितल मगदूम, विद्यासागर चराटे, अमित सारडा, संजय डाके, उदयसिंह निंबाळकर, आप्पासाहेब पाटील, रविंद्र भंडारी, अ‍ॅड. पवन उपाध्ये, सचिन बाबर, महेंद्र जाधव, दिपक पंडित, राजु पारीख, दिपक जाधव, अमृत पारख, हरीश देवाडीगा, नितीन ठिगळे, राजेश बांगड, संजय सुतार, लक्ष्मीकांत खंडेलवाल, पंडित ढवळे, सारंग भांबुरे, अभिजित पटवा आदी सहभागी झाले होते.