Main Featured

ठार मारण्याची धमकी व बलात्कार प्रकरणातील संशयितास 11 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी


 

Death threats and rape cases

इचलकरंजी येथे पती व मुलीला ठार मारण्याची धमकी (Death threats) देत विवाहितेवर बलात्कार प्रकरणातील संशयित नितीन दिलीप लायकर (रा. साखरपे हॉस्पिटलजवळ) याला गुरुवारी न्यायालयाने 11 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Advertise

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

पिडीत महिलेच्या तिच्या पती व मुलीस जीवे मारण्याची धमकी देत लायकर याने वेळोवेळी बलात्कार केला. या प्रकरणी पिडीत महिलेने दोन महिन्यापूर्वी गावभाग पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर पिडीत महिला पतीसह जात असताना दोघा अनोळखी व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून लायकर याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्यास अश्‍लिल चित्रफिती  (Pornography) व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली होती. 

या प्रकरणी गावभाग पोलिसात लायकर याच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी असलेला लायकर  चार दिवसापूर्वी येथील जिल्हा व सत्र न्यायलयात हजर झाला. त्याला दिलेला अंतरीम जामीन रद्द करत न्यायालयाने लायकर यास अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गावभाग पोलिसांनी त्याला अटक केली. आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 11 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली.