Death-of-the-actress

सिनेमा आणि बॉलिवूडसाठी धक्कादायक बातमी आहे. बंगाली आणि हिंदी सिनेमासाठी काम करणारी अभिनेत्री मिष्टी मुखर्जीचं Mishti Mukherjee वयाच्या 27 व्या वर्षी निधन झालं आहे. शुक्रवारी संध्याकाळी बंगळुरु इथे मिष्टीने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान किडनीच्या आजाराने अभिनेत्री त्रस्त होती. किडनी फेल झाल्यामुळे अभिनेत्रीचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.

2013मध्ये मैं कृष्णा हूं ' चित्रपटाच्या डेब्यूमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मिष्टीला किडनीच्या समस्येनं ग्रासलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून मिष्टी कोटो डाएटवर होती. मात्र शुक्रवारी मिष्टीची प्राणज्योत मालवली. मिष्टीच्या पश्चात कुटुंबात तिचे आई-वडील आणि भाऊ आहेत. यामुळे मुखर्जी कुटुंबासोबतच बॉलिवूड आणि बंगाली सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Advertise

2020 या वर्षांत सिनेसृष्टीसाठी खूपच वाईट आहे. अनेक नामांकित अभिनेते आणि अभिनेत्री या वर्षात काळाच्या पडद्याआड गेल्यानं मोठी पोकळी निर्माण होत आहे. 2020मध्ये बॉलिवूडच्या अनेक बड्या स्टार्सनी जगाला निरोप दिला. ज्यात सुशांतसिंग राजपूत, इरफान खान यासारखे अनेक उत्कृष्ट तारे होते. यामध्ये आता मिष्टीच्या जाण्यानं बंगाली आणि हिंदी सिनेमासृष्टीत शोककळा पसरली आहे.

2013 मध्ये मिष्टीनं डेब्यूनंतर अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये कामं केली. 2014 साली तिच्यावर गंभीर आरोप लागल्यामुळे ती मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरली. मिष्टीवर सेक्स रॅकेट चालवत असल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी मिष्टीच्या घराची झडती घेतल्यानंतर अनेक सीडी आणि साहित्य जप्त केलं होतं. या छापेमारीनंतर पोलिसांनी मिष्टीला हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटमध्ये पकडलं होतं.