Dark-circles-will-disappear

Health बर्‍याच वेळा डोळ्यांभोवतील डार्क सर्कल Dark circle सौंदर्यात अडथळा बनतात. कमी झोप, जास्त थकवा आणि तणाव यामुळे डार्क सर्कल्स येतात. डार्क सर्कल येऊ नयेत यासाठी योग्य आहार आणि पुरेशी झोप महत्त्वाची आहे. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ते शक्य होत नाही. तुम्हालाही डार्क सर्कल्स आले असतील तर अगदी घरगुती उपायांनी तुम्ही त्यापासून मुक्ती मिळवू शकता.

डोळ्याभोवतील काळी वर्तुळे कशी दूर करावीत पाहुयात.

कोरफडचा गर

myupchar.com शी संबंधित डॉ. अप्रतिम गोयल यांनी सांगितलं, कोरफडचा गर डोळ्यांखालील काळेपणा दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. प्रथम हे जेल डोळ्यांखाली लावा. तिथं थोडा वेळ मालिश करा आणि 10 ते 12 मिनिटं तसंच ठेवा. यानंतर कापसाने नीट पुसून घ्या. कोरफड जेलमुळे त्वचा मऊ होते आणि डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या दूर होतील. कोरफड त्वचा हायड्रेटेड ठेवून त्वचा मुलायम ठेवण्याचं कार्य करतं.

अॅपल व्हिनेगर

अॅपल व्हिनेगरमध्ये बरीच जीवनसत्त्वं, खनिजं आणि चांगलं एन्झाइम्स असतात, ज्यामुळे त्वचा सुधारते. एक चमचा अॅपल व्हिनेगर घ्या आणि ते कापसाच्या मदतीने डोळ्यांभोवती लावा. दिवसातून दोन वेळा हे व्हिनेगर लावल्यास डोळ्यांभोवतील काळे डाग काही दिवसांत अदृश्य होतील. मात्र व्हिनेगर डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी घ्या आणि तसं झालं तर लगेचच पाण्याने डोळे धुवा.

नारळ तेल

Advertise

myupchar.com शी संबंधित डॉ. अप्रतिम गोयल म्हणाल्या, नारळाच्या तेलात अनेक पोषक घटक असतात. नारळतेल मॉइश्चरायझेशनसाठी देखील वापरतात. झोपण्यापूर्वी हलक्या बोटांनी डोळ्यांखाली नारळ तेल लावा आणि मालिश करत रहा आणि रात्रभर ठेवा. असं नियमित केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर होती.

काकडी

डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी काकडी उत्तम आहे. कारण त्यात विटाक्सिन, ओरिएंटिन आणि कुकुर बिटासिनसारखे अनेक अँटीऑक्सिडंट्स आहेत. काकडीच्या गोल चकत्या करून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. नंतर या चकत्या डोळ्यांवर अशा प्रकारे लावा की गडद वर्तुळे झाकले जातील. 10 ते 15 मिनिटांनी काकडी काढून डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. आठवडाभर दिवसातून दोनदा ही प्रक्रिया केल्यास गडद वर्तुळे कमी होतील.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेले लाइकोपिन आणि फायटोकेमिकल्स असतात. लाइकोपिन घटक त्वचेला निरोगी ठेवतात. एक चमचा बटाट्याचा रस एक चमचा टोमॅटोच्या रसात मिसळा. डोळ्याच्या गडद वर्तुळांवर ते लावा आणि 10 मिनिटं तसंच ठेवा. यानंतर दोन मिनिटं थंड पाण्याने धुवा. 2 ते 3 आठवड्यांसाठी दिवसातून दोनदा या पद्धतीचा अवलंब केल्याने गडद वर्तुळे दूर होतील.