Criticism-of-Uddhav-Thackeray


Politics
अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यातील मंदिरं खुली करण्यात आलेली नाहीत. या मुद्द्यावरून आक्रमक होत भाजपने राज्यभरात आंदोलन केलं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackerayयांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत वादग्रस्त पत्र लिहिलं. यावरून गदारोळ सुरू असतानाच आता भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.

'बार आणि दारूची दुकाने सगळीकडे सुरू झाली आहेत आणि मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का? काही विचित्र लोकांकडे कधी विवेकी असल्याचं सिद्ध करणारं सर्टिफिटेक मागावंसं वाटतं', असं ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

Advertise

दरम्यान, राज्यपालांनी पत्र लिहित हिंदुत्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या याच वाक्याचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यपालांना उत्तर देताना नक्की काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

'महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही,' असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर केला होता.