Crime-against-wife-with-Mithun-Chakraborty's-son

बॉलिवूडमध्ये हॅशटॅग Hashtag मी टूचं वादळ आल्यानंतर आता आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या पत्नी आणि मुलामुळे अडचणीत सापडले आहे. अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या पत्नी आणि मुलाविरोधात ओशिवारा पोलिसात बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्ती गर्भ पडल्याचा आरोप एक पीडित तरुणीनं करत तक्रार दाखल केली आहे.

पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार मिथुन चक्रवर्ती Mithun Chakraborty यांचा मुलगा महाक्षय उर्फ मेमो आणि पीडित तरुणी 2015 पासून रिलेशनशिपमध्ये होते. 2015मध्ये मेमोने पीडित तरुणीला घरी बोलवले. मेमोनं सॉफ्ट ड्रिंगमधून नेशेच्या गोळ्या देऊन बलात्कार 

Advertise

rapeकेल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. इतकच नाही तर लग्नाचं आमिष दाखवून तिची फसवणूक केली. वारंवार मेमोने या तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले त्यातून पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तो आणि त्याच्या आईकडून गर्भ पाडण्यासाठी धमकवण्यात आल्याचा आरोपही पीडितेनं केला.दरम्यान पीडित तरुणीने मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलाला गर्भ पाडण्यास साफ नकार दिला. त्याचवेळी मेमोने 

काही गोळ्या खायला दिल्या आणि जबरदस्तीनं गर्भ पाडल्याचा आरोपही या पीडित तरुणीनं केला आहे. केवळ लग्नाचं आमिष दाखवलं मात्र प्रत्यक्षात विषय काढला तर टाळाटाळ होत असल्यानं तरुणीनं त्याच्याविरोधात बलात्कारासह फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

पीडित तरुणीनं ओशिवारा पोलिसात फिर्याद देत मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात गेली मात्र तेव्हा पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर मेमो आणि मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी यांनी पीडितेला धमकवण्यास सुरुवात केली.

पीडित तरुणी याच दरम्यान दिल्लीला गेली असताना तिने रोहिणी कोर्टात या प्रकरणी न्याय मागण्यासाठी याचिका दाखल केली. या प्रकरणी कोर्टाकडून प्राथमिक पुराव्यांच्या आधारे एफआयआऱ दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ओशिवारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आता पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येणार आहे.