इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश सिताराम भोरे (वय 48 रा. सोलगे मळा शहापूर) यांच्या आत्मदहन प्रकरणी सहाजणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  त्यामध्ये मुख्याधिकारी संतोष खांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, स्वच्छता निरिक्षक महादेव मिसाळ, मक्तेदार कंपनीचे प्रतिनिधी मारुती पाथरवट व घंटागाडी चालक अमर लाखे यांचा समावेश आहे. या प्रकरणी ओंकार गोपाल भोरे (वय 27 रा. रेणूकानगर, यड्राव) यांनी दिलेल्या तक्रारीत या सर्वांनी भोरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Must Read

1) महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग?

2) महाराष्ट्र राज्याच्या 'या' विभागात भरती

3) अभिनयानंतर 'या' श्रेत्रात पदार्पण करतेय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर

4) मुंबई आणि पुण्यासाठी Good News

5) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

मागील आठवड्यात शहरातील कचरा उठाव करणार्‍या घंटागाडीच्या पाठीमागील बाजूस दोरीने मृत डुक्कर बांधून ते रस्त्यावरुन फरफटत घेवून जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी त्याला विरोध दर्शवत घंटागाडी चालक अमर लाखे यास मज्जाव केला होता. त्यावेळक्ष भोरे व लाखे यांच्यात वादावादी होऊन लाखे याने भोरे यांना धक्काबुक्की करत मारहाण केली होती. शिवाय भोरे यांना धमकी देत मृत डुक्कर घंटागाडीत टाकण्यास भाग पाडले होते. याबाबत भोरे यांनी लाखे याच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते.

तक्रारी संदर्भात कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे भोरे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी दुपारी नगरपरिषदेच्या वाहन पार्किंगच्या प्रवेशव्दारातून आत येताना भोरे यांनी आत्मदहन केले. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना सांगली सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना काही तासातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर भोरे यांच्या नातेवाईक व समर्थकांनी त्यांचा मृतदेह सोमवारी रात्री नगरपरिषदेच्या प्रवेशव्दारात ठेवत आंदोलन केले होते. जोपर्यंत जबाबदार अधिकार्‍यांसह संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेह न हलविण्याची भूमिका घेतली होती. अखेर रात्री उशिरा नगरपरिषदेच्या चार अधिकार्‍यांसह सहाजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर भोरे यांचा मृतदेह तेथून हलविण्यात येऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.