Main Featured

हातकणंगले तालुक्यातील "हे" गाव शंभर टक्के कोरोनामुक्त


 

Corona free villageइचलकरंजी शहरापाठोपाठ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेले हातकणंगले तालुक्यातील चंदूर हे गाव बुधवारी शंभर टक्के कोरोनामुक्त (Corona free)  झाले. उपचार सुरु असलेल्या सर्वच कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून गावात कोणीही कोरोनाबाधित नाही.

शहरालगतच असलेल्या चंदूर गावात शेतीसह यंत्रमाग व्यवसायही मोठ्या प्रमाणात पसरला आहे. शहरालगत गाव असल्याने ग्रामस्थांचा शहराशी दैनंदिन संपर्क आहे. त्यामुळे इचलकरंजीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आपसूकच चंदूर गावामध्येही त्याचा शिरकाव झाला. 

Advertise

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली

बघता-बघता शंभर दिवसांत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 115 वर पोहचली. पण बुधवारी चंदूर गावातील उपचार सुरू असणार्‍या सर्व बाधितांना डिस्चार्ज देण्यात आल्याने गाव कोरोनामुक्त झाले. तरीसुध्दा ग्रामस्थांनी शासन नियमांचे पालन करुन काळजी घेणे गरजेचे आहे. या कोरोना काळात आपत्कालीन समितीचे सदस्य, एक डॉक्टर, पोलिस पाटील यांचे वडील यांचेसह सातजणांचा मृत्यू झाला. तर उर्वरित 108 बाधित बरे होवून घरी परतले. त्यामुळे आजमितीला चंदूर गाव कोरोनामुक्त झाले आहे. 

कोरोनाच्या काळात घर टू घर सर्व्हे, तपासणी, रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्या, काडा याचे वाटप करणाजया आशासेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच ग्रामविकास अधिकारी, कोरोना काळात सेवा देणारे डॉक्टर यांचे सोशल मिडियावरून अभिनंदन होत आहे.