इचलकरंजी येथे संगणकीय असेसमेंट (Computer Assessment) उतारे परिपूर्ण नसल्याने त्यामध्ये शासन आणि नागरिकांची फसवणूक होणार आहे. संगणकीय असेसमेंट उतारे अपडेट होईपर्यंत नागरिकांना पूर्ववत हस्तलिखित असेसमेंट उतारे देण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन ताराराणी आघाडीचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.

निवेदनात, नगरपरिषदेकडील रेकॉर्ड खात्याकडून हस्तलिखित पध्दतीने असेसमेंट उतारे मालमत्ताधारकांना दिले जात होते. परंतु सध्या हे उतारे संगणकीय पध्दतीने देण्याबाबत मुख्याधिकारी यांना सबंधीत विभागाला आदेश दिल्याचे समजते. परंतु संगणकीय असेसमेंट उतारे परिपूर्ण नसल्याने त्यामध्ये शासन, नगरपरिषदेसह नागरिकांची फसवणूक होणार आहे. त्याचबरोबर शासनाचे आर्थिक नुकसान होणार आहे. 

Advertise

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

आजमितीला जवळपास 75 ते 100 मालमत्ताधारकांनी असेसमेंट उतारेसाठी मागणी केलेली आहेत. वास्तविक संगणकीय असेसमेंट उतारे अपडेट केल्यानंतर आदेश देणे योग्य होते. पण तत्पूर्वीच आदेश निर्गमित केल्यामुळे मालमत्ताधारकांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे. या बाबीचा गांभीर्याने विचार करुन जोपर्यंत संगणकीय उतारे अपडेट होत नाही तोपर्यंत पूर्वीप्रमाणेच हस्तलिखीत असेसमेंट उतारे देणेत यावेत, असे मोरबाळे यांनी म्हटले आहे.