इचलकरंजी शहरात  विविध भागातील सुमारे 13 झाडे तोडल्याप्रकरणी  शिवाजीनगर पोलिसांनी चौघांजणां विरोधात गुन्हा दाखल केला  नरेंद्र खिमजी पटेल (रा. कोल्हापूर रोड), संजय खा. पाटील व संभाजी लक्ष्मण पोवार, सुनिल बाळू यादव (रा. गुरुकृपा मोटर्स कोल्हापूर रोड) अशी त्यांची नावे आहेत   

Must Read

1) शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी

2) येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना...

3) CSK च्या सुपर फॅनचे दिड लाख फिटले; धोनीनं खुद्द घेतली दखल (VIDEO)

4) खासदार उदयनराजे सरकारवर भडकले

5) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी

इचलकरंजी ते कबनूर जाणार्‍या रस्त्यावर नरेंद्र पटेल यांनी रेन ट्री च्या झाडावर विषारी औषध टाकून झाडास इजा पोहोचवली. तर कोल्हापूर रोडवरच असलेल्या गुरुकृपा मोटर्स याठिकाणी अशोकाची पाच झाडांची सुनिल यादव यांनी तोड केली. विवेकानंद कॉलनी परिसरात रस्त्यावर असलेले रेन ट्री चे झाड संजय पाटील यांनी तोडले. तर कमला नेहरु हौसिंग सोसायटीत खाजगी जागेतील नारळ, बदाम,अशोक अशी 6 झाडे संभाजी पोवार यांनी तोडली. याबाबत नगरपरिषदेकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर मुख्याधिकारी यांनी या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार याबाबतची फिर्याद उद्यान निरिक्षक संपत बळवंत चव्हाण यांनी दिली आहे