Main Featured

बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यात यावीत : राष्ट्रवादी कामगार संघटनाCertificate to construction workers


इचलकरंजी येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांचे सर्व कामकाज ऑनलाईन सुरु केले आहे. नवीन नोंदणी अथवा नुतनीकरणासाठी नोंदणीकृत इंजिनिअर, कंत्राटदार तसेच ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक, शहरी भागामध्ये नगरपालिका, महापालिका अधिकार्‍यांनी दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य मानले जाते. त्यामुळे इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कामगार संघटनेच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्त भोईटे यांना देण्यात आले.

Advertise

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

निवेदनात, इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिरोळ या दोन्ही तालुक्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी आहे. इचलकरंजी हद्दीत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या कामासाठी शिरोळ व हातकणंगले तालुक्यांमधील हजारो कामगार इचलकरंजीत येतात. हे कामगार काम करीत असलेली बांधकामे इचलकरंजी शहराच्या हद्दीत असलेने ग्रामीण भागातील ग्रामसेवक बांधकाम कामगार असलेबाबतचे प्रमाणपत्र देणेस चालढकल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांचे नुकसान होणार आहे. शिरोळ व हातकणंगले हे दोन्ही तालुके आणि इचलकरंजी शहरातील जे बांधकाम कामगार इचलकरंजी नगरपालिकेच्या हद्दीत बांधकामावर काम करतात त्यांना बांधकाम कामगार असलेबाबतचे प्रमाणपत्र इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने देण्यात यावे. त्यामुळे बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी व नुतणीकरण करणे सुलभ होणार आहे, असे म्हटले आहे.

या शिष्टमंडळात संघटनेचे संस्थापक मिश्रीलाल जाजू, मदन मुरगूडे, सुखदेव लाखे, सचिन साठे, दिपक रेपाळ, वसंत कवळीकट्टी, परशराम कत्ती, पांडुरंग पांढरपट्टे, गजानन लोहार आदींचा समावेश होता.